। रसायनी । वार्ताहर ।
जिल्ह्यातील कातकरी समाजाप्रमाणे ठाकूर समाजातील लोकांचे जातीचे दाखले काढण्यासाठी चर्चा आणि आराखडा तयार करण्यात आला आहे. काही दिवसातच जात पडताळणी समिती विभागाचे मार्गदर्शन घेऊन जातीच्या दाखल्यांचे कॅम्प सुरू करण्यात येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. कल्हे आदिवासीवाडीवर झालेल्या जातीच्या दाखला काढण्याच्या शिबिरात एका दिवसात 1118 जातीच्या दाखल्यांचे वाटप आणि 803 फॉर्म भरून घेण्यात आले. हा एक जागतिक विक्रम असून, त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांचा उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नामदेव ठाकूर, सदस्य मनीष कातकरी, सदस्य रत्नाकर घरत उपस्थित होते.