। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा औद्योगिक वसाहतीत पडघे फाटा परिसरात खाद्य तेलाने भरलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. स्थानिकांनी या घटनेची माहिती तळोजा वाहतूक पोलिसांना दिली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत सदर आगीवर नियंत्रण मिळवले.







