। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
ओम साई व आर्यन्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12 मार्च रोजी बॉक्स क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. ने.सुभाष चंद्र बोस मार्ग (शेगवाडा) येथे भरविण्यात येणार्या या सामन्यात लकी ड्रॉचे प्रमुख आकर्षण आहे.
या सामन्यात प्रथम क्रमांक पटकविणार्या संघास 11 हजार रुपये व भव्य चषक, द्वितीय संघास 7 हजार रुपये व चषक तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळविणार्या संघास दोन हजार रुपये व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. यासोबतच उत्कृष्ट मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक या खेळाडूंची निवड करून त्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी रुपेश पाटील 9028530007, सचिन गुरव 7020729799, अभिजित कारभारी 9270318485, पिंट्या मुळेकर 7058746488, शैलेश पटेल 7020401465 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.