हाशिवरेमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार

तीन दिवसीय स्पर्धेचा क्रीडाप्रेमी लुटणार आनंद

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत, शिवबा क्रीडा मंडळ, मोकलआळी हाशिवरे यांच्यावतीने शिवबा चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 29 ते 31 मार्च या कालावधीत स्पर्धेचा थरार हाशिवरेमधील बालवीर मैदानात रंगणार आहे.

या स्पर्धेत 32 संघाचा सहभाग असणार आहे. सर्व सामने सोडत पध्दतीने खेळविले जाणार आहेत. शुक्रवारी (दि.29) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 31 मार्च रोजी होणार्‍या अंतिम सामन्यानंतर प्रथम क्रमांकाला 40 हजार रुपये व चषक, द्वीतीय क्रमांकाला 20 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी दहा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यत येणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीरास आकर्षक चषक तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीराला चषक देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अधिक माहितीसाठी सुरज म्हात्रे, सौरभ मोकल, दुर्गेश मोकल, तेजस डाकी, मनिष मोकल, पुनित पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version