| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांचा दि.16 रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.14 रोजी शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्या पुढाकाराने व्ही. के. हायस्कूलच्या भव्य पटांगणावर सकाळी 11 वाजल्यापासून महिला आणि पुरुष गटातील कबड्डी सामन्यांचा थरार रंगणार आहे.
पनवेलमध्ये रंगणार कबड्डीचा थरार
