चोरढे विद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम

। रोहा । प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यातील दिनाभाई मोरे शिक्षण संस्था सानेगाव संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर चोरढे या विद्यालयाने आपल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखून ठेवली आहे. या ही वर्षाचा निकाल 100 % लावला आहे.


या निकालात प्रथम क्रमांक शेडगे सिद्धी चंद्रकांत 88.00%, द्वितीय क्रमांक ठाकूर सलोनी संदीप 84.80%, तृतीय क्रमांक महाडिक त्रिशा गणपत 81.20%, चतुर्थ क्रमांक काटकर वेदा महादेव 78.60%, तर पंचम क्रमांक घाणेकर रत्नेशा दिनेश 78.00% इतके गुण संपादित केले आहेत. विद्यार्थी वर्गाने मिळविलेल्या या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ, येथील मुख्याध्यापक व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच, स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला व तरूण मंडळ यांच्यासह पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version