ट्रेलरची बलकर गाडीला धडक

| पनवेल | वार्ताहर |

भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने सिमेंट बलकर गाडीला धडक दिल्याने या धडकेत चालक जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शंकर रामजी यादव हा जेएसडब्ल्यू कंपनीमधून टाटा बलकर (एमएच-46-एफ-5548) यात सिमेंट भरून मुंबई येथे जात होता. शंभर मीटर पेणकडील अंतरावर आला असता पनवेलकडून पेणकडे जाणारा ट्रेलर (एमएस-46-एच-4504) वरील चालकाने भरधाव वेगाने येऊन टाटा बलकरला ठोकर मारून अपघात केला. यात शंकर यादव यांच्या डोक्याला, पोटाला व पायाला मार लागला. त्यानंतर ट्रेलरचालक वैद्यकीय मदत न करता पळून गेला.

Exit mobile version