रहिवासी हितवर्धक संघाने केले वृक्षारोपण

| पनवेल | वार्ताहर |

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे पनवेल शहरात वृक्षारोपण 2024 चा उपक्रम नमन बॅटरी ते अमरधाम हायवे सर्व्हिस रोड, पनवेल येथे बकुळ, ताम्हाण, कांचन आपटा, गुलमोहर, कादंब, अर्जुन, सोनचाफा, सातवीण, बदाम अशी देशी पर्यावरण पूरक झाडे लावून संपन्न झाला.

सदर उपक्रमांस माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते प्रथम झाड लावून सुरवात झाली. मंडळाचे कार्यकारणी सदस्य, कार्यकर्ते, देणगीदार तसेच पर्यवरणप्रेमी हितचिंतक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन एकशे पन्नास वृक्षांची लागवड केली, सदर वृक्षांची देखभाल सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ करणार आहे, मंडळाचे अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर, सचिव रामचंद्र मोचेमाडकर, खजिनदार दीपक तावडे, सहखजिनदार बाबाजी नेरूरकर आणि सदस्य, युवा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन ही झाडे लावली आहेत आणि त्यांची देखभाल करणार आहेत. मंडळाच्या सदर उपक्रमांचे पनवेल परिसरात कौतुक होत आहे. आत्ता पर्यंत मंडळा तर्फे चारशे पन्नास झाडे लावून मंडळाने निसर्ग संवर्धन कार्य उत्तमरित्या पार पडले आहे.

Exit mobile version