कुणबी बांधवांची एकी हेच समाजाचे बळ- बोर्ले

| म्हसळा | वार्ताहर |
कुणबी बांधवांची एकी हेच समाजाचे बळ आहे, असे प्रतिपादन कुणबी समाज नेते तालुका चिटणीस गणेश बोर्ले यांनी केले. समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती समाज बांधवांसमोर ठेवण्यासाठी एका स्मरणिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री. बोर्ले बोलत होते.

म्हसळा तालुका कुणबी समाज विभाग ठाकरोली यांनी समाजाची जनजागृती करून सर्वच क्षेत्रात उन्नती व्हावी यासाठी गाडी चुकली आणि नाटकाच्या माध्यमातून करमणुक करीत समाजहिताचा वसा तेवत ठेवण्याचे महत्वपुर्ण कार्य केले आहे, असे गणेश बोर्ले यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते समाज बांधवांना शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष महादेव भिकू पाटील, महेंद्र टिंगरे, सचिव गणेश बोर्ले, राजू धाडवे, अनिल काप, महिला मंडळ अध्यक्षा स्नेहा खापरे, पनवेल महिला अध्यक्षा लिना रटाटे, युवक अध्यक्ष रुपेश भोगल, सचिव उमेश पोटले, प्रचारक महेंद्र घडशी, क्रीडा समिती अध्यक्ष विजय बोर्ले, विभाग अध्यक्ष नथुराम भुवड, विशेष उपस्थिती प्रदीप मोगरे, अनंत काप आदींसह सर्व समाज बांधव, महिला मंडळ उपस्थित होते.

Exit mobile version