| उरण | प्रतिनिधी |
उन्हाळी हंगामात अलिबाग मध्ये पिकणारा औषेधी गुणकारी पांढरा कांदा बाजारात विक्रीसाठी आला आहे. या कांद्याला बाजारात मागणी आहे. यावर्षी कांद्याच्या एका माळेसाठी 200 ते 350 रुपये दर आकारला जात आहे. या वाढत्या दरामुळे नागरिकांनी आवश्यक असूनदेखील खरेदीत हात आखडता घेतला आहे. यात कांद्याच्या आकारानुसार दर आकारला जात आहे. वाढत्या उष्णतेवर हा कांदा फायदेशीर असून यंदा चांगलाच भाव खात आहे. 300 ते 350 रुपयांना कांद्याच्या माळेची विक्री होत आहे. विशेष म्हणजे ग्राहक भाव न करता कांदा खरेदी करीत आहेत.
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे हा कांदा राज्यभर आणि देशात प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे रायगडमध्ये येणारे पर्यटक मोकळ्या हाताने परत जात नाहीत. हा गुणकारी औषधी कांदा जाताना घेऊन जात आहेत. अलिबाग-मुरूडमध्ये येणारे पर्यटक परतीच्या प्रवासासाठी अलिबाग-वडखळ मार्गाने मुंबई, पुण्याकडे निघताना सफेद कांद्याची माळ, कलिंगड, वालाच्या शेंगा, ताजी भाजी, औषधी कंदमुळे आवर्जून खरेदी करत आहे. यात पांढऱ्या कांद्याला विशेष मागणी आहे अलिबाग तालुक्याती तळवली, सागाव, मारुती, खंडाळा, नेवली, कार्ले, मानीभुते आदि ठिकाणी कांद्याची लागवड केली जाते. यंदा कांद्याची माळ 150 ते 300 रुपये दराने आम्ही विकतो असे विक्रेती सुजाता पाटील यांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यातील तळवली, सागाव, कृषी विभागाने पांढरा कांदा लावडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला असून या वर्षी लागवड क्षेत्र वाढले आहे. 150 ते 175 रुपये माळ असा दर गेल्यावर्षी यावर्षी होता. दर वाढले आहेत. अलिबागचा पांढरा गुणकारी औषधी कांदा तयार झाला आहे. अलिबाग-वडखळ मार्गावर सध्या हा कांदा विक्रीसाठी उपलब्ध असून त्याला मागणी आहे. अलिबागच्या शेतात पिकविलेला सेंद्रिय पांढरा कांदा विक्रीसाठी आणत आहे. या कांद्याला चांगली मागणी आहे. ग्राहक भाव न करता कांदा विकत घेत आहे. उरणच्या बाजारात नाक्यावर मोठ्या प्रमाणात या कांद्याची विक्री केली जात आहे. या पांढऱ्या कांद्याची बाजारात आवक वाढल्या नंतर कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता विक्रेत्यांनी दिली आहे. मात्र सद्या आवक कमी असल्याने दर वाढ झाली आहे.
बहुगुणी अन औषधी पांढरा कांदा बाजारपेठेत दाखल
