मालाठे ग्रामस्थांचा पाणीप्रश्‍न सुटणार

नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता

| तळा | वार्ताहर |

तालुक्यातील मालाठे येथील पाणीप्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असून, मालाठे नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्याबाबतचे पत्र मालाठे ग्रामस्थांना माजी पालकमंत्री आ. आदिती तटकरे यांनी दिले आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग रायगड जिल्हा परिषदेमार्फत मालाठे येथे जलजीवन मिशन अंतर्गत ही नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून, या योजनेसाठी 84,88,295 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेमुळे मालाठे गावसह धनगरवाडी, बौद्धवाडी तसेच वाघवाडी, दळीभाग, डुंगवाडी या आदिवासी वाड्यांचा पाण्याचा प्रश्‍नदेखील सुटणार आहे. या योजनेला शासकीय मंजुरी मिळाल्याचे पत्र आ. आदिती तटकरे यांनी तालुका पदाधिकार्‍यांना तसेच तालुका पदाधिकारी यांनी मालाठे ग्रामस्थांना दिले.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष नाना भौड, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, अ‍ॅड. उत्तम जाधव, पढवन उपसरपंच अनिल माटल, मंगेश भगत, जगदीश शिंदे, मधुकर वारंगे यांसह गिरणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version