धामणीतील आदिवासींचा पाणीप्रश्‍न सुटला

‘हारक्युलेस’ कडून पाणीयोजनेसाठी 30 लाखांचा निधी
। खोपोली । प्रतिनिधी ।

खालापूर तालुक्यातील धामणी गाव व धामणी आदिवासीवाडीतील पाणी योजनेसाठी हारक्युलेस व्हाईस कंपनीच्या पुढाकारातून 80 हजार लीटर पाणी साठवण क्षमता असलेली टाकी बसविण्यात आली आहे. त्यासाठी कंपनीकडून 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यामुळे येथील ग्रामस्थांचा पाणीप्रश्‍न कायमचा मिटला असून, समाधान व्यक्त केले आहे.

जवळपास बाराशे लोकवस्ती असलेल्या गावात ग्रामपंचयतीच्या माध्यमातून पाणी योजना असली तरी पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष चिले यांच्या पाठपुराव्यामुळे बजाज ग्रुप हारक्युलेस व्हाईस कंपनीच्या सामाजिक दायित्व फंडातून जवळपास 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करीत चार महिन्यांपूर्वी आदिवासीवाडीत डोंगराळ भागात पाण्याची साठवण करण्यासाठी टाकी बाधण्याचा शुभारंभ केला होता. या कामासाठी रोटरी क्लब ऑफ खोपोलीने ही मोलाचे सहकार्य केल्याने जलद गतीने काम पूर्ण करीत या साठवण टाकीचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले.

यावेळी हारक्युलेस व्हाईस्ट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी विवेक महेंद्र, विजय सिंग, किरण मुकादम, निलेश खैरनार, सतीश डुकरे, किरण बैलमारे, ग्रामपंचयत सदस्या सीमा चिले, वर्षा लोते, सौ. हिलम, राकृष्ण लोते, शरद लोते, नितीन चोगले, नितीन लोते, ज्ञानदेव साळेकर, ग्रामसेवक सदाशिव लवटे, पोलीस पाटील सुरेश मनेर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र जोशी, माजी अध्यक्ष सुरेश खेडकर, नरेश मनेर, नंदकुमार लोते, संदीप साबळे, अजित किरकीडे, विशाल लोते, तुषार चोगले, चंद्रकांत लोते, रुपेश धुमाळ, धीरज दळवी, वैभव साबळे, ओंकार धुमाळ, संदीप पिंगळे, तानाजी पिंगळे, सिध्देश लोते, सुवर्णा लोते, पूजा खाडे, भरती लोते, श्‍वेता महाडिक, जया लोते, प्रणाली चिले, प्रमोद खाडे, शाळा प्रमुख शशिकांत फणसे व शिक्षक प्रवीण कोल्हे यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.

Exit mobile version