पिरकोण गावावर कोसळले दु: खाचा डोंगर
। उरण। वार्ताहर ।
उरण तालुक्यातील पिरकोण गावातील रहिवासी असलेला चेतन काशिनाथ गावंड या तरुणाला चिर्ले गावाजवळील रस्त्यावर भरधाव वेगातील ट्रेलरने चिरडले या झालेल्या अपघातात चेतन गावंड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघात हा आज सकाळी ठिक दहाच्या सुमारास झाला आहे. चेतन गावंडच्या मुत्यूची बातमी पसरताच पिरकोण तसेच पुर्व विभागात दु: खाचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पिरकोण गावातील रहिवासी असलेला चेतन काशिनाथ गावंड हा तरुण कामगार नेहमी प्रमाणे पनवेल, नवी मुंबई या परिसरात कामावर आपल्या मोटारसायकल वरून जात होता. चिर्ले गावा जवळील रस्त्यावर मागून येणाऱ्या भरधाव वेगातील ट्रेलरने चेतन गावंड यांच्या मोटारसायकला जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात चेतन गावंड या कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. चेतन गावंड यांच्या मुत्यूची बातमी पसरताच पिरकोण तसेच पुर्व विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.