माणगाव तलाठी कार्यालयात चोरी

| माणगाव । वार्ताहर ।

माणगाव तलाठी भवन येथील कार्यालयात चोरी करून अज्ञात चोरटा 45 हजाराचा ऐवज घेऊन फरार झाला आहे. सदरची घटना शनिवार (दि.5) ते सोमवार (दि.7) सकाळी 10:15 वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत पळसगाव बुद्रुकचे कोतवाल मनोहर बापू कांबळे (वय-53) रा.पळसगाव खुर्द ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेत तलाठी भवन येथे कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने बंद कार्यालयाच्या दरवाजाचा कांडीकोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून कार्यालयात प्रवेश करून कार्यालयातील दोन लॅपटॉप तसेच बॅगमधील कागदपत्रे असा एकूण 45 हजार रुपयांचा ऐवज घेऊन अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदर घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.गायकवाड हे करीत आहेत.

Exit mobile version