इस्कॉन कंपनीतील चोरी उघडकीस

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| रसायनी | प्रतिनिधी |

रसायनी येथील कराडे गावात असलेल्या अतिरिक्त एमआयडीसीतील इस्कॉन कंपनीमध्ये 20 मार्च रोजी चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी कंपनीच्या आवारात घुसून 53 हजार 500 रुपये किमतीची वायर व पाईप चोरी केले होते. त्याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. चोरीला गेलेला माल व आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली होती. जवळपास सहा ते सात महिने उलटून गेल्यानंतर या तपासाची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना प्राप्त झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चोरीतील विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांनी इस्कॉन कंपनीत चोरी केली असल्याची कबुली त्यांच्या पालकांच्या समक्ष दिली. चोरी करणारे चोर हे अल्पवयीन (विधी संघर्षित) बालक असून त्यांना शुक्रवारी (दि.3) ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक लिंगप्पा सरगर, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, प्रसाद पाटील, पोलीस हवालदार सुधीर मोरे, रवींद्र मुंडे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.

Exit mobile version