बिर्ला कंपनीत ॲल्युमिनियम पत्र्याच्या रोलची चोरी; चौघेजण अटकेत

। रसायनी । प्रतिनिधी ।

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील लोहोप जवळील बिर्ला कार्बन कंपनीत शुक्रवारी (दि.22) अज्ञात चोरट्यांनी ॲल्युमिनियम पत्र्याचा रोल 220 कि.ग्रॅ. वजनाचा व त्याची किंमत रू.70,400/- चोरून नेण्यात आल्याची रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा राबविण्यात आली. तपासिक अंमलदार पोलीस हवालदार रणजीतसिंह खराडे यांनी मुद्देमालासह चोरी करणारे आरोपी विजय वाघमारे उर्फ विजय हिलम (22), विजय पवार (20), संजय वाघे (22), महेश वाघे (20) ता. खालापूर यांना मुद्देमालासह अटक केली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version