। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी हद्दीतील कासप येथील सत्वारो कोटींग प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या कार्यालयातून 2 लाख 20 हजार आठशे रुपये रक्कम चोरी करणाऱ्या तिघांना रसायनी पोलीसांनी अटक केली आहे.
8 ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास कारखान्याचे इमारतीमधील मागील बाजूस जाळी असलेला लोखंडी दरवाजा तोडून चोरट्यांनी कार्यालयातील टेबलमधील लॉकर तोडुन लॉकरमध्ये ठेवलेली रक्कम चोरी करून नेली होती. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींचा शोध घेऊन अटक केली. याप्रकरणी अधिक तपास मपोसई अनुसया ढोणे हे करीत आहेत.







