अज्ञातावर गुन्हा दाखल
। माणगाव । प्रतिनिधी ।
ट्रान्स्फार्मरमधील कॉपर कॉईल चोरल्याप्रकरणी अज्ञात आरोपी चोरट्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा दि.17 नोव्हेंबर ते दि.27 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान मौजे विळे-भागाड एमआयडीसी मधील ए 65 प्लॉट जवळ तालुका माणगाव येथे घडला. याबाबतची फिर्याद आकाश राजकुमार पूर्वे (वय-36) रा.दत्तकृपा बिल्डिंग माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, 70 हजार रुपये किंमतीचे महावितरण कंपनीचे डेल्ट्रोन कंपनीचा सीरिअल 44, 46 रोहित्र ट्रान्स्फार्मर क्र.4805676 मधील सुमारे 170 किलो वजनाची कॉपर (तांबे धातू) कॉईल कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.12/2022 भादवि संहिता कलम 379 भारतीय विद्युत अधिनियम 2003 चे कलम 136 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.बेग हे करीत आहेत.







