पनवेल | वार्ताहर |
तळोजा परिसरात फेज वन येथील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये कपाटामध्ये ठेवलेले सुमारे एक लाख अट्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरी करणार्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.
तळोजा वसाहतीतील कामधेनु बिल्डींग फेज वन येथील एक 60 वर्षीय महिला येथे राहत आहे. यावेळी या महिलेने सुमारे 19 ग्रँम वजनाच्या दोन बांगड्या बनविल्या होत्या. त्या बांगड्या घरातील कपाटामध्ये ठेवले होते. यावेळी दिवाळी सणानिमिताने घरामध्ये रंगरंगोटी करण्याचे काम सुरु होते. यावेळी काम करणारे अनेक कामगार यांच्या घरात काम करून गेले होते. हे काम सुरु असताना घरातील सर्वजण दुसर्या रूममध्ये होते. त्यानंतर धनत्रयोदशी दिवशी बाजारात खरेदी करण्याकरिता जात असताना त्या महिलेने तीच्या कपाटामध्ये ठेवलेले बांगड्या व्यवस्थित करण्याकरिता गेली असता बांगड्या कोठेही दिसल्या नाहीत. त्या महिलेने पूर्ण घराची झडती घेतली. मात्र बांगड्या सापडल्या नाहीत. त्यामुळे आपल्या बांगड्या व हातातील घड्याळ चोरीला गेल्याचे लक्षात येताच तळोजा पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी चोरी करणार्याच्या शोध सुरु केला आहे.