| नवीन पनवेल | वार्ताहर |
दुकानाचे लॉक तोडून चोरट्यांनी दहा हजार रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर, ड्रिल मशीन, केबल वायरची चोरी केली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद मकरानी हे मुंबई येथे राहत असून त्यांचा जुबेर फॅब्रिकेशन्स या नावाने पाटील वाडी, तळोजा येथे वेल्डिंगचा व्यवसाय आहे. ते 12 फेब्रुवारी रोजी दुकान लॉक करून घरी गेले. 13 फेब्रुवारीला सकाळी आले असता लॉक तुटलेले दिसले. दुकानात प्रवेश केला असता वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन, ग्राइंडर, केबल वायर सापडून आले नाहीत. सामान इतरत्र शोधले असता सापडून आले नाही. चोरट्याने ते चोरून नेले.