कारची काच फोडून लाखोंची रोकड लंपास

। पनवेल । प्रतिनिधी ।

कारची काच फोडून कारमधील पाच लाख रुपये रोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आलम किस्मतअली कंकाली हे तळोजा फेज-1 येथे राहतात. त्यांनी त्यांची कार जे.डब्ल्यू.एल. कंपनीच्या जेएनपीटी हायवे पाडेघर, गव्हाण फाटा परिसरात पार्क करून ते वॉशरूममध्ये गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने कारची काच फोडली. त्यानंतर डॅशबोर्डलगत असलेल्या ड्रॉवरमधील पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेली. काही वेळाने कारजवळ परतल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला.

या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

Exit mobile version