| पनवेल | वार्ताहर |
राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना शहरातील भुसार मोहल्ला येथे घडली आहे.
इम्तियाज अब्दुल लतीफ पावले (35) रा. भुसार मोहल्ला, पनवेल हे त्यांच्या राहत्या घरात झोपले असताना घराचा मुख्य दरवाजा कडी न लावलेला व फक्त ढकलून बंद केला होता. दरम्यान, अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा ढकलून आत प्रवेश करून घराच्या हॉलमध्ये ठेवलेले हजारो रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.