| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
निवडणूक आयोगाच्या विरोधात दाखल केलेली याचिका आणि आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांची निष्क्रियता या दोन प्रकरणात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालायामध्ये याचिका दाखल केली आहे. परंतु या दोन्ही प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालायने नकार दिला आहे. या प्रकणात सुनावणी करण्यासंदर्भात ठाकरे गटाच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालायमध्ये मेन्शनिंग केलं होतं. पण आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर कोणतीही तारीख दिली नाही. त्यामुळे ही दोन प्रकरणं आता किमान दोन ते चार आठवडे आता लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.