| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रातल्या 92 नगरपालिका मधील ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आज इतर मोठी प्रकरणे सुनावणीसाठी असल्यामुळे या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही. मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड रचने संदर्भातील सुनावणी आज पार पडली. त्यात राज्य सरकारने पुन्हा तीन आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील पुढची सुनावणी कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे वारंवार तारखा पुढे ढकलत असल्याने निवडणुकांच भवितव्य अंधारात दिसून येत आहे.