| मुंबई | वृत्तसंस्था |
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या कुटुंबात आणि जेथून आंदोलनाची सुरुवात झाली त्या अंतरवाली सराटी येथे एकही कुणबी नोंद सापडली नाही. अंबड तालुक्यात केवळ 12 गावांमध्ये 127 नोंदी आढळल्या आहेत. नोंदी जाणूनबुजून मिळाल्या नाहीत, हा मोठा प्रश्न नाही. आता आम्ही मागे हटणार नाही. मी स्वार्थी बणनार नाही. मराठे आता मुंबईतून आरक्षण घेऊनच येणार आहेत. सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोनी उपमुख्यमंत्री यांची मनोज जरांगे यांच्यासोबत बैठक सुरु आहे. शिंदे समितीकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. हैदरासोबत कुणबी नोंदी मिळण्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे. तसेच, पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरु आहे. प्रमाणपत्र तपासण्याच काम 85 टक्के पूर्ण झाले, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.






