आयपीएल संघात होणार बदल

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धा आता पुढील वर्षी होणार आहे. परंतु, त्याआधी प्रत्येक संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कारण आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. मात्र, अद्यापही हे मेगा ऑक्शन कसं होणार आणि काय नियम असणार हे निश्चित झालेलं नाही. त्यामुळे याबाबत लवकरच आयपीएल फ्रँचायझी आणि बीसीसीआय यांच्यात चर्चा होईल. दरम्यान, आयपीएल फ्रँचायजींनी दर पाच वर्षांनी मेगा ऑक्शन, 4 किंवा 6 खेळाडूंचे रिटेंशन, राईट टू मॅच पर्याय असे अनेक पर्याय या मेगा ऑक्शनआधी फ्रँचायझींनी बीसीसीआयला सुचवले असल्याचे समजत आहे. फ्रँचायझीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, दर 5 वर्षांनी मेगा ऑक्शन घेण्याचे काही फायदे आहेत. ज्यामुळे संघांना युवा खेळाडूंना घडवण्यासाठी वेळ मिळेल, तसेच संघातही सातत्य राहिल. अनेक फ्रँचायझींनी खेळाडू घडवण्यासाठी ऍकेडमीही तयार केल्या आहेत. अशात 5 वर्षांचा वेळ मिळाला, तर खेळाडू घडवण्यासाठी मदत होईल.

Exit mobile version