माझं टार्गेट महाराष्ट्र नासवणारे..

। मुंबई । प्रतिनिधी ।

राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ दाखवून सडकून टीका केली होती. तर यालाच प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचे जुने व्हिडीओंचा सपाटा लावला. यानंतर मुंबईत पुन्हा सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचं नाव घेत हल्लाबोल केला. इतकेच नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, राज ठाकरे हा माझा अजिबात विषय नाही पण अडचण काय झाली त्यांना जी सुपारी मिळाली होती. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिली सुपारी माझ्या नावाची होती. महायुतीने माझा धसका घेतलाय राज ठाकरे माझं कधीही टार्गेट नव्हतं, असं त्यांनी म्हटलं. तर मी राज ठाकरेंना मानतही नाही. राज ठाकरे हे माझ्यावर बोलले म्हणून माझा हिसका दाखवला मी त्यांच्यावर बोलतही नाही माझं टार्गेट हे इथले कळसूत्री बाहुल्या हलवणारे देवेंद्र फडणवीस हे टार्गेट असल्याचे सुषमा अंधारे म्हणाले.

Exit mobile version