रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

| पनवेल | प्रतिनिधी |

रस्त्यावर नोटा पडल्याचे सांगून त्या उचलण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाची 50 हजारांची रोकड चोरट्यांनी पळवली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. लालचंद्र पाटील (49) यांच्यासोबत हा प्रकार घडला. बँकेतून 50 हजारांची रोकड काढून ते रिक्षाने घराकडे चालले होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना रस्त्यावर नोटा पडल्याचे सांगितले. त्यामुळे पाटील यांनी रिक्षा थांबवून मागे पाहिले असता काही अंतरावर 10, 20 व 50, 100 रुपयांच्या नोटा दिसून आल्या. रस्त्यावर पडलेल्या त्या नोटा आपल्याच असाव्यात असे समजून ते नोटा उचलायला गेले. त्याचवेळी त्यांनी बँकेतून काढलेली व रिक्षात ठेवलेली 50 हजारांची रोकड व त्यासोबत 10 लाखांच्या एफडीचे पेपर व बँकेचे पासबुक, चेकबुक चोरट्यांनी पळवले. रस्त्यावर पडलेल्या नोटा उचलून ते रिक्षाकडे आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Exit mobile version