अश्‍लिल फोटो मिडीयावर टाकण्याची धमकी

। पनवेल । वार्ताहर ।
अश्‍लिल फोटो व व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर तसेच नातेवाईकांकडे पाठवून बदनामी करीन त्याबदल्यात मला 10 लाख रुपये दे अशी धमकी देणार्‍या एका इसमाविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कोप्रोली गावात राहणार्‍या एका 30 वर्षीय महिलेला एका ओळखीच्या इसमाने सदर महिलेचा विश्‍वास संपादन करून तिच्या राहत्या घरी तिच्या नकळत तिचे अश्‍लिल फोटो व व्हिडीओ तयार करून सदर व्हिडीओ हे तुझे नातेवाईक, समाजात तसेच सोशल मिडीयावर टाकण्याची बदनामी करून 10 लाख रुपयाची मागणी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version