दोन वेगवगेळ्या अपघातात तीन ठार

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवगेळ्या अपघातात तीन ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पनवेलजवळील जेएनपीटी मार्गावरून मोटारसायकलवरून यतिक मेहता (23) व त्याच्यासोबत निशा पासवान (27) हे चालले असताना यतिकचा मोटारसायकलवरील ताबा सुटून अपघात झाला. त्यामध्ये हे दोघे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, दुसर्‍या अपघातात पनवेल एसटी स्टँडजवळ श्रीवर्धन आगारातील एसटी बसची स्कुटी गाडीस धडक बसल्याने झालेल्या अपघातात स्कुटीचालक वैभव कथारे (38) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version