। सोलापूर । प्रतिनिधी ।
माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ टेंभुर्णी-अकलुज रोडवर मस्के वस्तीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.8) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडला असून यात तीन जणांचा मृत्यू झाला. ओंकार शिंदे (वय 18 वर्ष, रा. करकंब ता. पंढरपूर), प्रशांत खडतरे (वय 22 वर्ष, रा. अकलूज ता. माळशिरस), निखिल वंजारे (वय 20 वर्ष, रा. करकंब ता. पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत.
सुरज लोखंडे (वय 18, रा.उपरी), दयावंत जाधव (वय 22, रा. अकलूज, ता.माळशिरस), प्रशांत खडतरे (वय 22, रा. अकलूज, ता.माळशिरस) हे तिघे दुचाकीने अकलूजच्या दिशेने जात होते. ते मस्के वस्तीजवळ आले असता अकलूजकडून येणार्या ओंकार आणि निखिल यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रशांत खडतरे याचा जागीच मृत्यू झाला. तर ओंकार शिंदे यांचा टेंभुर्णीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तसेच, निखिल वंजारी याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर या अपघातात सुरज लोखंडे आणि दयानंद जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत.