| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गुंड हरपाल सिंग उर्फ हॅरियर नावाच्या कैद्यावर तुरुंग प्रशासनाने अमानुष छळ केल्याचा आरोप हरपाल सिंगच्या भावाने केला आहे. त्याच्या भावाने सांगितले की, हरपाल सिंगला आत खुर्चीला बांधून बेदम मारहाण केली जात आहे. तळोजा तुरुंगात तैनात असलेला कदम नावाचा एक अधिकारी हरपाल सिंगकडून पैशाची मागणी करत होता. हरपालने पैसे देण्यास नकार दिल्यापासून त्याचा सतत छळ केला जात आहे. त्याचा केवळ मानसिकच नाही तर शारीरिक छळही केला जात असल्याचे हरपाल सिंग यांचे म्हणणे असल्याचा आरोप त्याच्या भावाकडून करण्यात येत आहे. तसेच, आरोपी गुरपाल सिंग उर्फ हॅरियर हा सलमान खानच्या फार्म हाऊसवर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.