| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर पोलीस ठाण्यासह तालुका पोलिसांच्या विशेष पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत पनवेल तालुक्यातील बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 35 बांगलादेशीयांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात बांगलादेशीयांना शोधण्याचे काम परिमंडळ 1 व परिमंडळ 2 येथे सुरू आहे. त्या अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शहरातील तक्का परिसरात कारवाई करत 12 जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने अशाच प्रकारे कारवाईत वावंजे परिसरातून 23 बांगलादेशीयांना ताब्यात घेतले असून पुढील शासकीय कारवाई करण्यात आली आहे.