खोपोलीत विचित्र अपघातात कुटूंबातील तिघांचा मृत्यू… व्हिडिओ पाहून तुमचेही मन होईल सुन्न…

। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर अपघाताची मालिका थांबता थांबेना झाली असून 1 जूलै रोजी 5 वाजून 10 मिनिटाच्या सुमारात वेगवेगळ्या वाहनाचा अपघात होऊन यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. खोपोलीजवळ बोरघाटात गुरुवारी (दि.1) संध्याकाळी झालेल्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.पुण्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या कंटेनरने एका कारला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातग्रस्त कार पुढील ट्रकवर आदळली व कारने पेट घेतला.

यामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये एका बालकाचा समावेश आहे.अपघातानंतर मुंबई लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली. खोपोली पोलीस, महामार्गावरील वाहतूक पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या ग्रुपचे सदस्य, देवदुतची टिम अपघातस्थळी दाखल होऊन तातडीने मदत केली.कंटेनर चालक यामध्ये गंभीररित्या जखमी आहे.

या अपघातावेळी वाहतूकीला अडथळा होऊन नये, म्हणून बोरघाट पोलिस यंत्रणा, अपघातग्रस्त टिमने तात्काळ उपाययोजना राबवून वाहतूक सुरळीत केली असून जखमींना एम.जी.एम.रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले आहे.

Exit mobile version