स्नूकर क्लासिकमध्ये तिघांची उत्तम कामगिरी

। मुंबई । प्रतिनिधी ।

सीसीआय स्नूकर क्लासिक 2025 स्पर्धेत मलबार हिल क्लबचा अनुभवी क्यूईस्ट राजीव शर्मा, ऋषभ जैन आणि सूरज राठी यांनी तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. सीसीआयच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या गेलेल्या या रोमांचक स्पर्धेत त्यांनी आपली कर्तृत्वता सिद्ध केली.

पात्रता फेरीच्या दुसर्‍या सामन्यात राजीव शर्माने अरविंद लखमाना विरुद्ध 3-0 असा विजय मिळवला. तर, ऋषभ जैनने अनुभवी खेळाडू अमित सप्रूला 3-0 असे मात केले. ऋषभने सातत्य राखत उत्कृष्ट खेळ सादर केला. तिसर्‍या फेरीसाठी पात्र होण्यासाठी सूरज राठीने चेतन मुलानीवर 3-0 अशी मात केली, ज्यामुळे त्याने मुख्य ड्रॉसाठी आपली दावेदारी मजबूत केली. दुसर्‍या फेरीतील अन्य लढतीत अनुज अग्रवालने जय पाटीलला 3-0 असे पराभूत करत आपला चांगला फॉर्म कायम ठेवला. अनुजने तिसर्‍या फ्रेममध्ये 50 गुणांचा ब्रेक रचून जय पाटीलला पहिल्या फेरीतच पराभूत केले.

Exit mobile version