। अलिबाग । प्रतिनिधी।
अलिबाग-पेण महामार्गावरील तिनविरा स्टॉपजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. हा अपघात सोमवारी (दि.3) सकाळच्या सुमारास झाला असून यात तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
