गुरुवारी माजी आ. स्व. मधुकर ठाकूर यांची शोकसभा

अलिबाग पंचायत समिती व नगरपरिषदेच्या वतीने आयोजन

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I

माजी आमदार स्व. मधुकर शं. ठाकूर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अलिबाग पंचायत समिती व अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शोकसभा गुरूवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पीएनपी नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती अलिबाग पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर व अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली. सदर शोकसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version