| पाली | प्रतिनिधी |
पाली एसटी स्थानकातील आरक्षण खिडकी बंद असल्याने प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत आणि त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या प्रामुख्याने एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्यामुळे यांचा नाहक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पाली एसटी स्थानक गेली कित्येक वर्ष अनेक समस्यानेग्रस्त असताना त्यामध्ये अजून एक समस्येची भर पडलेली आहे. एसटी स्थानकातील तिकीट आरक्षण मशीन गेली कित्येक दिवस बंद पडल्याने ती दुरुस्तीसाठी पेण येथील कार्यालयात पाठवण्यात आली आहे. पाली शहरासह सुधागड तालुक्यातून विशेषता ठाणे, पुणे, मुंबई या ठिकाणी जाणारे प्रवासी तिकीट आरक्षणासाठी जात असतात आरक्षण खिडकी बंद असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. आरक्षण खिडकी बंद असल्याने प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करावे लागते, जे काहीवेळा शक्य नसते. जास्त खर्च: आरक्षण खिडकी बंद असल्यामुळे काही दलाल प्रवासींकडून जास्त पैसे उकळतात, ज्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसते. एसटी प्रशासनाने या समस्येवर लक्ष केंद्रित करून प्रवाशांना सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी.
तिकीट आरक्षणाची मशीन बिघडल्याने ती पेण येथील कार्यालयात पाठवण्यात आली असून लवकरच मशीन मिळावी यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.
रोहिदास कोकणे,
कंट्रोलर पाली एसटी स्थानक
पाली एसटी स्थानकातील तिकीट आरक्षण खिडकी गेली कित्येक दिवस बंद असल्याने प्रवाशांना जादा पैसे देऊन तिकीट आरक्षण करावे लागत असल्याने प्रवासी संतापले आहेत. लवकरच खिडकी सुरू करण्यात यावी अन्यथा शिवसेना उबाठा आंदोलन छेडणार आहे.
विद्देश आचार्य,
पाली शहराध्यक्ष शिवसेना उबाठा
