कर्जाला कंटाळून घेतला गळफास

। कोलाड । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील वरसगांव येथे एका इसमाने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. हि धक्कादायक घटना शनिवारी (दि. 16) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वरसगावसह कोलाड आंबेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली.

रोहा तालुक्यातील वरसगाव भिरा फाट्यावर चहाचा व्यवसाय करणारे सहदेव कांदलगावकर (54) यांनी चहाची टपरी चालविण्याकरिता कर्ज घेतले होते. मात्र, ते कर्ज फेडू शकले नाही. अखेर कर्ज फेडू न शकल्यामुळे, कर्जाला कंटाळून कांदलगावकर यांनी चहा टपरीच्या मागे सामान ठेवण्याच्या खोलीमध्ये शनिवारी सकाळी 7.45 च्या सुमारास नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास सुरू केला आहे.

Exit mobile version