सिनेतारकांची उपस्थिती
| खोपोली | वार्ताहर |
कृषीवल आयोजित दिवस मानाचा सौभाग्याचा हळदीकुंकू सोहळा शुक्रवारी (8 एप्रिल) खालापूर फाटा मैदान श्रीकृष्ण पेट्रोल पंपाजवळ मराठी सिनेतारकाच्या विशेष उपस्थित दुपारी 4 वाजता रंगणार आहे.यंदा निर्बंध मुक्तीनंतर महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी शेकापच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख तथा कृषीवलच्या कार्यकारी संचालक चित्रलेखा पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून सिनेतारकाच्या सोबत आनंद लुटण्याची संधी प्राप्त करून दिले अहे.
या हळदीकुंकू कार्यक्रमास सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्राजक्ता माळी, अस हे सुदंर आमचे घर मधील सुकन्या मोने ,स्वराज्य सौदामिनी ताराराणी स्वरदा ठिकणे, तुमची मुलगी काय करते मधुरा वेलणकर,जुई भागवत आदी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व महिलावर्गानी हळदी कुंकू कार्यक्रम ला उपस्थित राहावे असे आवाहन कृषीवल परिवारातर्फे करण्यात आले आहे.