पारंपरिक चर्मवाद्ये उद्योग संकटात

शासनाचा लोकाश्रय-राजाश्रय नाही

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

भारतीय संस्कृती, संगीत आणि कला यांना हाजारो वर्षांपासूनचा इतिहास आहे. चर्मवाद्य उद्योग कला ही त्यातीलच एकअभिजात कला असून परदेशी वस्तूच्या ऑनलाईन मागणीमुळे येथील कारागिर नामशेष होण्याचे संकट घोगावत आहे. महाराष्ट्राच्या लोकसंगीतात अशा वाद्यांचा महत्वाचा वाटा आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून या पारंपरिक चर्मवाद्य कला आणि कारागिरांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळत नाही. गणेशोत्सव नजीक असल्याने मुरूड शहरात गेल्या 15 वर्षांपासून येत असलेले टेम्भुर्णी सोलापूर येथील संदीप तबला मेकर्स यांनी चर्मवाद्य बनविण्यासाठीचे दुकान महिनाभर आधी बाजरापेठेत थाटले आहे. सचिन भोसले, अभिजित पवार आणि लखन पाले असे तिघे जण येथे तबला, पखवाज, नाल, ढोलकी, हार्मोनियम, दग्गा विक्री आणि दुरुस्तीचे कोणतेही काम ते करीत असतात. ही त्याची वडिलोपार्जित पारंपरिक कला असून संपूर्ण कुटुंब जपत आहे, अशी माहिती संदीप तबला मेकर्सचे सचिन भोसले यांनी दिली.

गणेशोत्सवात जाखडी, बाल्या डान्स, शक्ती- तुरा अशी कोकणातील विविध नाच कला देखील मोबाईलच्या युगात कमी होत चालल्या आहेत. पूर्वीच्या काळात या कलांचा गणेशोत्सव काळात मोठया प्रमाणात आंनद घेतला जात असे परंतू आता सर्वच बदल मुळावर येण्याचे संकट गडद होताना दिसत आहे. बाहेरील देश भारतीय संस्कृती किंवा पारंपारिक कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ऑनलाईनमुळे वस्तूंच्या मागणीमुळे आगामी काळात मोठा धोका देशातील वस्तू आणि कलेला होऊ शकतो. शासनाकडून देखील या पारंपरिक भारतीय चर्मवादयांना लोकाश्रय मिळत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कारागिरांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळण्याची दाट शक्यता दिसत आहे. ही कला लोप पावत असल्याने आमच्या पिढीकडे शासनाने लक्ष न दिल्यास आम्हाला सुशिक्षित बेकारीमध्ये होरपळावे लागणार आहे अशी भावना सचिन भोसले यांनी व्यक्त केली.

मुरूड, श्रीवर्धन, रोहा, मुरूड येथे आमच्या शाखा आहेत. यंदा पारंपरिक वाद्यांची विक्री आणि दुरुस्तीचे घटले आहे. 15 वर्षात प्रथमच उत्पन्न दीड- दोन लाखावरून 50 हजारांवर येईल असे येणार्‍या ग्राहकांवरून दिसत आहे.

सचिन भोसले
संदीप तबला मेकर्स
Exit mobile version