| पनवेल | प्रतिनिधी |
उलवे ब्रिज सर्कलजवळ भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविलेल्या ट्रेलरने कारला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारचे नुकसान झाले असून, अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार फॅलेक्स जसीन डिसोझा (30), व्यवसाय नोकरी, रा. चांजे, उरण हे आपल्या ताब्यातील मारुती इको कारमधून प्रवास करीत होते. उलवे ब्रिज सर्कल येथील पाण्याच्या पुलाच्या टाकीखाली ही घटना घडली.
तक्रारदाराच्या कारच्या मागून येणाऱ्या ट्रेलरच्या चालकाने ट्रेलर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून तक्रारदार यांच्या कारला उजव्या बाजूने धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले. त्यानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास परि. पोलीस उपनिरीक्षक सुनील सरगर करीत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेलरचालकाचा शोध घेण्यात येत आहे.
उलवे पुलाजवळ ट्रेलरची कारला धडक
