अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय बालरोग तज्ञ संघटना पश्चिम विभाग रायगड शाखा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वयात येताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, खाणं, पिणं, खेळ, व्यायाम, आजार, व्यसन, मोबाईल आणि सोशल मिडियाच्या दुनियेचं आकर्षण अशा अनेक अभ्यासाव्यतिरिक्त पण महत्वाच्या गोष्टींविषयी माहिती मिळावी या करिता पीएनपी संकुलाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
उमलत्या वयाशी जुळवून घेण्याची केविलवाणी धडपड करणार्या किशोरवयीन मुला-मुलींना सुयोग्य जीवनदृष्टी देणे शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आत्मिक ज्ञान तसेच स्व – संरक्षणाचे धडे आणि प्रश्न – उत्तर घेवून मोलाचे मार्गदर्शन डॉ. चित्रा कुलकर्णी, डॉ. जयश्री देशपांडे, डॉ. निलीमा भांडारकर, डॉ. विकास मोरे, डॉ. निशिगंध आठवले आणि पीएनपी होली चाईल्ड स्कूलचे प्राचार्य संजय मिर्जी यांनी केले. यावेळी इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.