गॅसशवदाहीनीचे पालिकेकडे हस्तांतरण

। पनवेल । प्रतिनिधी ।

पालिका हद्दीतील कळंबोली-रोडपाली वसाहती मधील स्मशान भूमीत गॅसशवदाहिणीचे काम सुरु करण्यात आले आहे. सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेल्या या कामासाठी जवळपास 80 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून, दीपावली पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती सिडकोचे अधिकारी श्रीकांत मते यांनी दिली आहे.

मते यांनी दिलेल्या माहितीनुसार, काम पूर्ण होताच शवदाहिणीचे हस्तांतरण पालिकेकडे करण्यात येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून वसवण्यात आलेल्या कळंबोली-रोडपाली वसाहतीची लोकसंख्या लाखोंच्या घरात जाऊन पोहचली आहे. वसाहतीत मृत झालेल्या व्यक्तींवर अंतिमसंस्कार करण्यासाठी रोडपाली तलावा जवळ सिडकोने दफन भूमी तसेच स्मशानभूमी उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी लाकडावर शव दहनसचे विधी केले जात आहेत. लाकडावर केल्या जात असलेल्या दहन विधीसाठी वृक्षतोड केली जात असल्याने तसेच लाकडापासून निर्माण होणार्‍या धुरामुळे प्रदूषण होत असल्याने सिडकोच्या माध्यमातून गॅसशववाहिनी बांधण्यात येत आहे. या ठिकाणी महानगर गॅस कंपनीच्या माध्यमातून लवकरच गॅस वाहिनीद्वारे गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. गॅस वाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच नागरिकांच्या सेवेत गॅसशवदाहीनी उपलब्ध केली जाणार आहे.

Exit mobile version