| उरण | वार्ताहर |
निसर्गाचे, पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती व्हावी या अनुषंगाने भेंडखळ ग्रामपंचायतीच्यावतीने ठाणकेश्वर मैदान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजीता पाटील, उपसरपंच अक्षता ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या प्राची ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य दिपक ठाकूर, अजित ठाकूर, लिलेश्वर भगत, अभिजीत ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या संगीता भगत, सोनाली ठाकूर, प्राची ठाकूर शितल ठाकूर, स्वाती घरत, स्वाती पाटील, ग्रामविकास अधिकारी किरण केणींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
भेंडखळ ग्रामपंचायतीने केले वृक्षारोपण
