वृक्षारोपण, वृक्षवाटप कार्यक्रम

। रसायनी । वार्ताहर ।

प्रसोल केमिकल्स कंपनी, रसायनी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रुप ग्रामपंचायत गोरठण यांच्या संयुक्त विद्यमानाने गोरठण येथे विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी फणस, जांभूळ, वड, बदाम आदी झाडांचे वृक्षारोपण करुन वृक्षवाटप करण्यात आले. तसेच, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पाच हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला असून वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही घेण्यात आली आहे. यावेळी सरपंच रमेश पाटील, अरुण जाधव, सचिन वर्मा, भालचंद्र पाटील, शिल्पा झेमसे, प्रतीक्षा चाव्हण, एल.बी. पाटील, प्रतिमा खैरे, रोहित इंगळे, संदीप पाटील, प्रसाद वाघमारे आदी उपस्थित होते.

Exit mobile version