| पनवेल | वार्ताहर |
पनवेल येथील कर्नाळा अभयारण्यात ट्रेकिंगसाठी आलेल्या एका ग्रुपमधील 38 वर्षीय ट्रेकरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडल्याचे उघड झाले आहे. ट्रेकिंगदरम्यान हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. 38 वर्षीय ट्रेकर्स पुण्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ट्रेकर्सच्या या मृत्यूमुळे ट्रेकिंगसाठी आलेल्या ग्रुपमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवार आणि रविवारची सुट्टी गाठून पुण्यातील ट्रेनेटी एडवेंचर ग्रुप पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयराण्यात ट्रेकिंगसाठी जवळपास या ग्रुपमधील 28 ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी आले होते. हे सर्व ट्रेकर्स पुण्यातील रहिवासी आहेत. कर्नाळा अभयारण्यात पोहोचल्यानंतर या ट्रेकर्सने, ट्रेकर्स ग्रुपचे प्रमुख रवींद्र जाळीहाल यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेकिंगला सुरुवात केली. मात्र, रविवारी सकाळी या ग्रुपमधील 38 वर्षीय कौस्तुभ देशपांडे यांचा ट्रेकिंगदरम्यान मृत्यू झाला, ट्रेकिंग करत असताना कौस्तुभच्या छातीत दुखू लागले आणि त्यानंतर हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.