आदिवासी जीवन माहिती उपक्रम

। म्हसळा । वार्ताहर ।
कोकण परिवार, शांतीदूत परिवार आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांना म्हसळा तालुक्यातील कोंझरी येथे आदिवासी जीवन आणि वनविभागाबाबत माहिती उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
दि. 11 मे रोजी कोंझरी येथे कोकण परिवार, शांतीदूत परिवार, म्हसळा वन विभागाकडून स्पाईसर पुणे महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांसाठी कोंझरी गाव येथे आदिवासी जीवन व वन माहिती देण्यात आली. राजेश रामदास राऊत वनपाल कोंझरी यांनी वनाचे प्रकार, वन संरक्षण अधिनियम 1980 व वन जीवन यावर सखोल माहिती दिली. याप्रसंगी तृषाली जाधव (राष्ट्रीय अध्यक्षा शांतिदूत परिवार) यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी, त्यांची संस्कृती, परंपरा आणी अडचणी यावर सविस्तर माहिती दिली.
यावेळी स्पायसर महाविद्यालय डॉ. क्रिसटोफर जेफरसन गणित अद्यापक, डॉ. सुभाष देओकुळे हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ बॉटनी युनिव्हर्सिटी ऑफ पुणे सध्या स्पायसर कॉलेजमध्ये फार्माकॉगनोसी, डॉ. सुजन थॉमस डीन डिव्हिजन ऑफ सायन्सेस व प्रोफेसर ऑफ बॉटनी व बायोटेक्नॉलॉजी स्पायसर डवेंटिस्ट युनिव्हर्सिटी, डॉ. नमिता डिसोजा प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स, आशा डिसोजा, डॉ. मयुरा दूधाने प्रोफेसर ऑफ बॉटनी, ललिथा स्वन्सी प्रोफेसर ऑफ बॉटनी, यविन प्रेसिडेंट ऑफ स्टुडन्ट स्पाईसर महाविद्यालय, योगेश सर (संस्थापक कोकण परिवार), भीमराव सूर्यतळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version