। कशेळे । वार्ताहर ।
कशेळे येथील तरुण मंगेश दोरे हा रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून आई वनिता दोरे यांनी कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत कशेळे पोलीस दुरक्षेत्र येथे हरवल्याची नोंद केली होती. दि. 24 नोव्हेंबर रोजी कशेळे येथील श्रद्धा फार्मच्या समोरच्या झाडीत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मंगेशचा मृतदेह आढळून आला. कशेळे येथील तरुण मंगेश दोरे हा कशेळे नाक्यावर एका भाजीच्या दुकानात कामाला होता. सोमवारी उशिरापर्यंत तो घरी आला नव्हता. मंगेश कुठेच आढळून न आल्याने कशेळे पोलीस दुरक्षेत्र येथे हरवल्याची नोंद केली करण्यात आली होती. दि.24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पोलिसांना श्रद्धा फार्म समोरच्या एका झाडाच्या फांदीला गळफास घेतलेला अवस्थेत असलेला इसम आढळला. लगेच पोलिसांनी भाऊ हरेश दोरे यांना फोन करून बोलावले. सदर व्यक्ती हा हरवलेला मंगेश दोरे असल्याची खात्री झाल्यावर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कशेळे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.