स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींचेही योगदान

| पेण | प्रतिनिधी |

स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींचा इतर समाजाप्रमाणे सहभाग होता ही बाब आदिवासीच्या अस्मितेच्या चळवळीने पुढे आणली ही अभिमानास्पद गोष्ट अंकुरच्या च्या कार्याची पावती देते असे उद्गगार प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी काढले. ते चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पेण येथे बोलत होते.

या वेळेस जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील, आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, पुरवठा अधिकारी थळे, नायब तहसीलदार आदि शासकीय अधिकारी उपस्थित होते. या वेळेस कातकरीच्या बोली भाषेत प्रलंबित वनहक्क दावे व इतर समस्यांवर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमात आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत भाजीपाला लागवड व लघु व्यवसाया करीता धनादेश वाटण्यात आले तसेच पुरवठा विभागातील अधिकार्‍यांकडून रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

प्रकरण अधिकारी शशिकला अहिरराव, आदिवासी युवा नेते संजय नाईक, गणेश वाघमारे, संतोष पवार, स्नेहल पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. पेण शहरात आदिवासी वेशभुषा, वाद्यवृंद हातात घोषफलक हाती घेऊन भव्य रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत हजारापेक्षा जास्त आदिवासी आपल्या नाग्याबाबाला श्रध्दांजली व्हायला पारंपारिक वेशात उपस्थित होते. 1997 मध्ये सर्व प्रथम या हुतात्म्यांना सार्वजनिकरित्या मानवंदना देण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या शेवटी शासकीय आदिवासी शासकीय वसतिगृह, अंकुर आश्रम, चाईल्ड हेवन व आदिवासी वाड्यातील युवकांनी पथनाट्य, नाच, गाणी सादर करून पेणकरांची वाहवा मिळवली.

Exit mobile version